ग्रामसभा नोटीस
प्रशासक/ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत खेड ता.इगतपुरी जि. नाशिक यांचे कडून कळविण्यात येते की, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान बाबतची ग्रामसभा दि.१७/०९/२०२५ रोजी ठीक सकाळी ११:०० वाजता मारुती मंदिर सभामंडप खेड येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून तरी सभेसाठी अधिकारी,पदाधिकारी शासकीय निमशासकीय कर्मचारी, व समस्त ग्रामस्थ यांनी सभेसाठी उपस्थित राहावे हि विनंती.
सभेपुढे येणारे विषय
- मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- आलेल्या अर्जांचे वाचन करणे.
- शासकीय परिपत्रकांचे वाचन करणे.
- मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान
- ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे..
